तुमच्याकडील पाचशे रुपयांच्या नोटा नकली तर नाही ना ! : अमळनेरात दहा हजारांच्या नोटांसह दोघे जाळ्यात
Two caught in Amalner while circulating fake notes : 10,000 notes seized अमळनेर : भुसावळ तालुक्यातील साकेगाव व जळगाव जिल्ह्यात नकली नोटा जप्तीची घटना अलिकडेच घटल्यानंतर आता अमळनेरातूनही दोघांना नकली नोटांसह पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सातत्याने घडणार्या घटनांनतर नागरीकांना आपल्या खिशातील नोटा नकली तर नाहीत ना? हे तपासण्याची वेळ आली आहे.
दोघा आरोपींना अटक
शहरातील पैलाड भागात नकली नोटा चालवण्याच्या प्रयत्नात संशयीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कैलास शिवराम भाई (28, ईहदरी, ता.कफराड, जि.बलसाड), वसंत कालसिंग मुलकाशा (23, कावडझिरी, ता.धारणी,, जि.अमरावती) यांना अटक करण्यात आली. पथकाने भोला टेलर यांच्या दुकानाजवळून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 10 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून संशयीतांची दुचाकी (एम.एच.27 डी.सी.7053) व दोन मोबाईल असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
