किनगावात ट्रक चालकाच्या मारेकर्‍यांना शोधण्याचे पोलिस यंत्रणेपुढे आव्हान

यावल तालुक्यात गळा चिरून झालेल्या हत्येने खळबळ


A challenge to the police system to find the killers of the truck driver in Kingaon यावल : व्यवसासायाने ट्रक चालक असलेल्या 58 वर्षीय प्रौढाची गळा चिरून निघर्र्ृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील किनगाव बु.॥. येथील चुंचाळे रस्त्यावर शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भीमराव शंकर सोनवणे (58, किनगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला असून गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.

गळा चिरून केली हत्या
किनगाव बुद्रुक गावात चुंचाळे रस्त्यावर इंदिरानगर असून तेथे भीमराव शंकर सोनवणे (58) हे वास्तव्यास होते. रोजंदारीने वाहन चालवून कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करीत होते. गुरूवारी दुपारी दोन वाजता भीमराव हे घराबाहेर पडले मात्र घरी परतलेच नाही तर शुक्रवारी सकाळी चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आल्याने गावात मोठी खळबळ उडाली. मजुरांनी गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती कळवण्यात आली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, असलम खान, सुशील घुगे, भूषण चव्हाण हे पथकासह दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता आणण्यात आला. डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले असून या प्रकरणी यावल पोलिसात विनोद भीमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, भूषण चव्हाण करीत आहे. मयताच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परीवार आहे. तीन दिवसांचा पोलिस कोठडी एक दिवसांचा पीसीआर


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !