भुसावळ शहरात उद्यापासून रंगणार कालिदास काव्यमहोत्सव
शहरातील 12 कवी गाजवणार संमेलन : जय गणेश फाउंडेशनतर्फे आयोजन
12 poets of the city will sing the song: Organized by Jai Ganesh Foundation भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्वर्गीय कालिदास विठोबा नेमाडे यांच्या स्मरणार्थ बहुभाषिक कालिदास काव्यमहोत्सव यंदा आयोजित केला आहे. रिंगरोडवरील संतोषी माता हॉल येथे रविवार, 26 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपासून हा महोत्सव सुरू होईल. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्कार’ प्राप्त डॉ. मधू खराटे भूषवतील.
निमंत्रीत कवी गाजवणार संमेलन
निमंत्रीत कवींमध्ये प्रा.डॉ.जे.पी.सुचिक, हमीद भुसावळी, हरीषकुमार नागदेव, प्रा. डॉ. रघुनाथ कश्यप, प्रा. डॉ. सुधा खराटे, रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे, प्रा.डॉ.सुरेश कुसुंबीवाल, हारुन उस्मानी, सीमा भारंबे, जयश्री काळवीट, संध्या भोळे अशा 12 जणांचा समावेश आहे. निवेदकाची भूमिका संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश कुळकर्णी हे पार पाडतील. विशेष अतिथी म्हणून माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथ खडसे, भुसावळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, हेडा ग्रुपचे संचालक मधुकर हेडा यांची उपस्थिती राहील, असे जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, समन्वयक गणेश फेगडे यांनी सांगितले.

सन्मानपत्र देऊन गौरवणार
कविसंमेलनात सहभागी सर्व 12 कविंना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, सिंधी अशा बहुभाषीक कविता ऐकण्याची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. रसिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन उमेश नेमाडे यांनी केले आहे
