कैर्यांचे पैसे परत घेतल्याच्या रागातून जळगावात महिलेसह पतीला मारहाण
A woman and her husband were beaten up in Jalgaon out of anger for taking back the money of the workers जळगाव : शहरातील गुजराल पेट्रोलपंप परीसरात महिलेसह तिच्या पतीला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून मारहाणीचा आरोप
जळगाव शहरातील संत मिराबाई नगरात शालू अशोक जाधव या पती अशोक किसन जाधव व कुटुंबियासह वास्तव्यास आहेत. शनिवार, 25 मार्च रोजी गुजराल पेट्रोलपंप परीसरात अशोक जाधव यांनी पिंप्राळा परीसातील मढी चौकात राहणार्या नितेश मिलिंद जाधव यांच्याकडून अर्धा किलो विकलेल्या कैर्याचे पैसे घेतल्याने या रागातून नितेश जाधव याने अशोक जाधव यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. शालू जाधव या भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही नितेश जाधव याने अश्लिल शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच अशोक जाधव व त्यांच्या पत्नी शालू जाधव या दोघांना नितेश याने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शालू जाधव यांच्या तक्रारीवरुन नितेश मिलिंद जाधव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.
