उसनवारीच्या सात लाखांसाठी जळगावात तरुणाचे अपहरण : दोघांविरोधात गुन्हा
Kidnapping of youth in Jalgaon for Usanwari’s seven lakhs: Crime against two जळगाव : उसनवारीने दिलेल्या सात लाखांची परतफेड न करणार्या तरुणाचे जळगावात सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले व नंतर शस्त्रांचा धाक दाखवून त्यास धमकावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी जिल्हापेठ पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिनेस्टाईल अपहरण करीत धमकावले
शहरातील सिंधी कॉलनीतील सनी इंद्रकुमार साहित्या या तरुणाने जैनाबाद येथील सागर सैंदाणे याच्याकडून 6 मार्च रोजी सात लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये त्याने 18 मार्च रोजी त्याला रोख स्वरुपात परत केले मात्र गुरुवार, 23 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सागर हा घरी असतांना त्याला सागर सैंदाणे याने फोन करुन तु मला पु.ना.गाडगीळ येथे भेटायला ये असे सांगितल्याने सनी हा लागलीच त्याचा मित्र पियुष मंदान याला सोबत घेवून पु.ना.गाडगीळ येथे भेटण्यासाठी गेला. याचवेळी सागर सैंदाणे याच्याकडील वाहन (एम.एच.09 एफ.बी.7727) मध्ये सनीचा हात पकडून तु गाडीत बस, असे बोलून त्याला गाडीत बसविले. यावेळी आपण जेवणासाठी बाहेर जात असल्याने सांगून सनी सोबत असलेले आकाश दुबे, आदर्श पुरोहित, पियूष मंदान यांना सुद्धा त्याला गाडीत बसविले. त्यानंतर गाडी चालविणारा शेखर सपकाळे याने गाडी भरधाव वेगाने जैनाबादच्या दिशेने नेली असता साहित्याने सागर सैंदाणेला आम्हाला कुठे जात आहोत, असे विचारल्यानंतर सागरने तुझ्याकडे असलेले माझे उसणे पैसे तू परत कधी करणार आहेस? माझ्या आईसोबत दोन मिनिटे बोलण्यासाठी तुला घेवून आहे, असे सांगत त्याला सागर सैंदाणेच्या घरी नेले. नंतर जैनाबाद परीसरात डांबून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी धारदार वस्तू चॉपर इतर वस्तूंचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
