सिंधी कोळगावातील सीआरपीएफ जवानाला वीर मरण
Heroic death of CRPF jawan in Sindhi Kolgaon भडगाव : सीआरपीएफमधील जवान व भडगाव तालुक्यातील सिंधी कोळगाव येथील जवान असलेले दीपक मधुकर हिरे यांचे मुंबईत उपचार सुरू असतांना वीरमरण शनिवार, 25 रोजी वीर मरण आले. या घटनेने भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
उपचार सुरू असताना आले वीर मरण
केंद्रीय गृह संरक्षण मंत्री अमित शहा, उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेते सनी देओल यांच्यासह अनेकांचे व्हीआयपी बॉडीगार्ड म्हणून कर्तव्य बजावणारे सिंधी कोळगाव, ता.भडगाव येथील जवान दीपक मधुकर हिरे यांच्या मुंबईतील तळोजा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरमयान शनिवार, 25 मार्च रोजी रात्री 8.40 वाजेच्या सुमारास त्यांना वीरमरण झाले.

व्हीआयपी टीममध्ये अंगरक्षक
स्व.दीपक हिरे हे 2002 मध्ये गांधीनगर येथे सीआरपीएफ जवान म्हणून भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे ट्रेनिंग व सैनिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनेते, उद्योगपती व राष्ट्रीय वरीष्ठ नेते यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. यामध्ये भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी, भारताचे गृहमंत्री अमित शहा, अभिनेते सनी देवोल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत व्हीआयपी संरक्षण टीममध्ये अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यांनी आपल्या सेवेत देश सेवा करत आपली जन्मभूमी असलेल्या गावात सुद्धा कुटुंबातील सदस्यांना समाजसेवेचा मौल्यवान सल्ला देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याचे नेहमीच सांगितले. स्व. दीपक हिरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.