यावल शहरातील पाच वर्षीय चिमुकलीने केला रोजा


यावल : सध्या मुस्लीम समाजबांधवांचे पवित्र रोजे सुरू आहेत. माजबांधवांकडून नमाज पठणासह रोजे केले जात आहे. शहरातील सुदर्शन चित्र मंदीर चौक डांगपूरा या परीसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या चार वर्षीय चिमकुली अफीरा फातेमाने पवित्र रमजान महिन्यातील रोजा (उपवास) ठेवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अफीरा फातेमा यास आजी, आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. या चार वर्षीय अफीरा याने रोजा (उपवास) सोडतांना अल्लाहकडे नमाज पठणातून प्रार्थना केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !