जळगावात 50 हजारांच्या गुटख्यांसह आरोपी जाळ्यात


Accused in Jalgaon along with 50 thousand Gutkha जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी रोखत तरुणाकडून 47 हजार 718 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप सीताराम परदेशी (36, रायपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयित संदीप परदेशी हा तरुण गावात अवैधरीत्या गुटखा विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, किरण पाटील, राकेश बच्छाव, राहुल रगडे, विशाल कोळी, महिला पोलिस कॉन्स्टेबल भारती देशमुख आणि अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता रायपूर येथे छापा टाकून संदीप परदेशी याच्याकडून 47 हजार 718 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला. तपास पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग धर्मा पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !