साकळी येथे सट्टा-जुगारावर कारवाई : एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Action on betting and gambling in Sakli : A case has been registered against one यावल : तालुक्यातील साकळी या गावात सट्टा-जुगार खेळवतांना एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सट्टा-जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
साकळी, ता.यावल या गावात पिळोदा रस्त्यावर एक जण सट्टा जुगार खेळवत आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मुजफ्फर खान, हवालदार अलाऊद्यीन तडवी, होमगार्ड रणछोड कुंभार हे त्या ठिकाणी गेले तेथे राजू मैताब तडवी हा स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा सट्टावर लोकांकडून बीट लावत होता पोलिसांचे पथक पाहून त्या ठिकाणी उभे असलेले लोक पळून गेले तर राजू तडवी यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
