मालवाहून वाहनाच्या धडकेने जळगावातील प्रौढाचा मृत्यू
An adult in Jalgaon died after being hit by a cargo vehicle जळगाव : भरधाव मालवाहू चारचाकी वाहनाच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 28 मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जळगाव-ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदीराजवळ घडला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश गणपत कुंभार (हिवरकर, 40, रा.चौघुले प्लॉट, ममुराबाद रोड, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
जळगावात अपघाताने शोककळा
वीटभट्टी व्यावसायीक सुरेश कुंभार हे पत्नी व तीन मुलांसोबत जळगाव शहरातील चौघुले प्लॉट भागात वास्तव्याला होते. मंगळवार, 28 मार्च रोजी त्यांचा मित्र दिलीप तुकडू कुंभार यांच्यासोबत वीटभट्टीवर जाण्यासाठी दुचाकी क्रमांक (एम.एच.41 एच.9981) ने ममुराबाद रस्त्याच्या दिशेने निघाले असताना मनुदेवी मंदीराजवळ समोरून येणारी छोटाहत्ती वाहन (एम.एच.19 सी.वाय.8173) ने जोरदार धडक दिल्याने सुरेश कुंभार हे जागेवरच ठार झाले तर सोबत असलेले दिलीप कुंभार हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेवून जखमीस उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत कुंभार यांच्या पश्चात पत्नी मनिषा, दोन मुले निलेश आणि योगेश आणि मुलगी कोमल असा परीवार आहे. तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे आणि हवालदार ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.
