भरधाव डंपरने रस्ता ओलांडणार्या बकर्यांना चिरडले : 15 बकर्यांचा मृत्यू
Goats crossing road crushed by speeding dumper: 15 goats killed जळगाव : महामार्ग ओलांडणार्या तब्बल 15 बकर्यांना भरधाव डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवार, 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ घडली. डंपर चालकास स्थानिक ग्रामस्थांनी पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
रस्ता ओलांडताना बकर्यांना चिरडले
कैलास लटकन कोळी (चिंचोली) हे बकर्या पालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 20 ते 25 बकर्या असून बुधवार, 28 मार्च रोजी सकाळी रानात बकर्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावात आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्या देखील मालकीच्या बकर्या सोबत होत्या. गावाजवळून जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेलेला असताना कैलास कोळी हे बकर्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकरकडून जळगावकडे भरधाव जाणारा डंपर क्रमांक (एम.एच.19 वाय.7773) ने रस्ता ओलांडणार्या बकर्यांना चिरडून टाकले. यात एकूण 15 बकर्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
