Two notorious accused from Jalgaon ‘MPDA’ जळगावातील दोन कुविख्यात आरोपी स्थानबद्ध

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : जळगाव शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ


Two notorious accused from Jalgaon ‘MPDA’ जळगाव : सामाजिक शांततेला अडसरू ठरू पाहणार्‍या जळगावातील दोन कुविख्यात गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. रीजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (22, अजमेरी गल्ली, तांबापुरा, जळगाव) व रीतेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (21, एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयीताची नाव आहे. संशयीतांची नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, सहा.निरीक्षक मोरे, गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, हवालदार जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसीचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नाईक सचिन पाटील, योगेश बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !