एसीबीच्या सापळ्याची म्हणून राज्यात चर्चा : संभाजीनगरात कृषी कार्यालयातील सर्वच अधिकार्‍यांना एसीबीकडून अटक


Discussion in the state as ACB’s trap : In Sambhajinagar, all the officers of the agriculture office were arrested by ACB  संभाजीनगर : एसीबीच्या विविध सापळ्यांची चर्चा नेहमीच रंगते. आतादेखील संपूर्ण कार्यालयच एसीबीच्या तावडीत सापडल्याने राज्यात त्याची चर्चा होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमवार, 27 रोजी हा सापळा यशस्वी झाला. ठिबक सिंचन साहित्याच्या तक्रारदार डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि डीलरविरोधात आलेला माहितीचा अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त 35 फाईलसाठी 24 हजार 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तीन महत्त्वाचे वर्ग दोनचे अधिकारी तसेच एक कंत्राटी ऑपरेटरला अटक करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
ठिबक सिंचन साहित्याच्या तक्रारदार डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि डीलरविरोधात आलेला माहितीचा अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त 35 फाईलसाठी 24 हजार 500 रुपयांची लाच खुलताबाद कृषी अधिकारी कार्यालयाकडून मागण्यात आली. तक्रारदाराने सापळा रचताच आरोपी तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (49), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (57), बाळासाहेब संपतराव निकम (57) या तिघा वर्गच्या दोनच्या अधिकार्‍यांसह सागर नलावडे (24) या कंत्राटी ऑपरेटरला अटक करण्यात आली.

लाच स्वीकारताच अटक
उपअधीक्षक साबळे यांनी सांगितले, की 32 वर्षीय डीलरने कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत विभागातील 35 शेतकर्‍यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. याबाबतच्या संचिका आरोपी कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त 35 फाईलसाठी प्रत्येकी सातशे रुपये फाईल याप्रमाणे 24 हजार 500 रुपयेची लाच अधिकार्‍यांनी मागितली होती. आरोपी अधिकार्‍यांच्या मागणीनुसार कंत्राटदार आरोपी सागर याने लाचेपोटी 24 हजार 500 रुपये स्वीकारले. विशेष म्हणजे आरोपी बाळासाहेब निकम याने मुळ लाच मागणीशिवाय अधिकचे एक हजार रुपये स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करुन ते स्विकारले. डीलरच्या तक्रारीवरुन एसीबीने शहानिशा केली असता आरोपी अधिकार्‍यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. चौघाही आरोपींना एसीबीने बेड्या ठोकल्या असून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उप अधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाअधीक्षक तथा सापळा अधिकारी दिलीप साबळे यांच्यासह हवालदार भीमराज जीवडे, नाईक पाठक, अंमलदार शिंदे, बागुल यांनी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !