जळगावात हद्दपार आरोपीकडून तलवारीच्या धाकावर दहशत : रामानंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या


जळगाव : हद्दपार आदेशाचे उल्लंघण करीत शहरात प्रवेश करून हातात तलवार घेवून दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगाराला खंडेराव नगरातून पोलिसांनी अटक केली. रामानंदनगर पोलिसात आर्मऍक्ट नुसार गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात आला. रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (25) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

माहिती कळताच आवळल्या मुसक्या
शहरातील राजीव गांधी नगरातील रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी हा (25) हा तरुण वास्तव्यास असून गेल्यावर्षी त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही त्याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन सोमवारी दुपारी 4 वाजता शहरातील खंडेराव नगरात हातात तलवार घेवून दहशत निर्माण केली. हा प्रकार रामानंदनगर पोलिसांना कळताच त्यांनी खंडेराव नगरात धाव घेवून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याच्याविरुद्ध ऑर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !