सावखेडासीमला लहान मुलांच्या खेळण्यातून वाद : दोघांची बालकास मारहाण
Argument over children’s toys in Savkhedaseem: Both beat the child यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात दोन जणांनी एका बालकाला मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. बालकाला छातीला आणी डोक्याला दुखापत झाली असून त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून जळगावी हलवण्या आले. या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.
दोघांविरोधात पोलिसात तक्रार
सावखेडासीम येथील जुबेदा हुसेन तडवी यांनी यावल पोललि ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गावात लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाल्यानंतर रज्जाक मुजात तडवी व अकबर मुजात तडवी (दोन्ही रा.सावखेडासीम) यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली. यात त्याच्या छातीला आणि डोक्याला दुखापत झाल्याने तातडीने यावल रुग्णालयात आणण्यात आले व प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध जुबेदा तडवी यांनी यावल पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
