साकळी येथील शैक्षणिक संस्थेत बोगस शिक्षक भरतीची तक्रार
Complaint about bogus teacher recruitment in an educational institute in Sakli यावल : तालुक्यातील साकळी येथील सर सय्यद एज्युकेशन सोसायटीमध्ये दोन शिक्षकांची बोगस भरती झाल्याची तक्रार शिक्षण विभागासह विविध ठिकाणी करण्यात आली आहे. संस्थाचालकांनी आपले नातेवाईक यांना आर्थिक देवाण-घेवाण करून नियुक्त्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्षक भरतीत तक्रारदाराची निवड न झाल्याने त्यांच्याकडून निराधार आरोप होत असल्याचे संस्थाचालकांकडून सांगण्यात आले.
बोगस शिक्षक भरती झाल्याची तक्रार
साकळी, ता.यावल येथील सर सय्यद एज्युकेशन सोसायटी संचलित अंजुमन -ए- इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आहे. या संस्थेत 26 फेब्रुवारी रोजी दोन शिक्षक भरती करण्यात आले. मात्र ही शिक्षक भरती बोगस करण्यात आल्याची तक्रार सीमरन शकील खान व सय्यद अखलाख सय्यद अहमद यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी गटशिक्षण अधिकारी, जिल्हा परीषदेचे शिक्षण अधिकारी तसेच शिक्षणमंत्री आदींकडे तक्रारी केल्या आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, जीवनशास्त्र शिकवणार्या शिक्षिका सेवानिवृत्त झाल्या व त्यांची जागा रीक्त होताच संस्थाचालकांनी 27 जुन 2022 रोजी पदभरती घेतली. यात सीमरन खान यांनी मुलाखत दिली मात्र तक्रार झाल्याने ही भरती थांबवावी लागली. तक्रारदार सीमरन खान यांनी विनामूल्य नववी व दहावीच्या वर्गाला ज्ञानदान केले व आता पुन्हा 26 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षक भरती करण्यात आली व यात लेखी परीक्षा न घेता तोंडी परीक्षेच्या आधारावर दोन पदांची भरती आर्थिक देवाण-घेवाण करून करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. व जर या दोन्ही जागांना शिक्षण विभागाने मंजुरी दिली तर जिल्हा परीषद कार्यालयात आमरण उपोषण करू असा, इशारा त्यांनी दिला आहे.
निवड न झाल्याने नैराश्यातून खोटी तक्रार
संपूर्ण शिक्षक पदभरती प्रक्रिया पारदर्शक झाली आहे व तक्रारदार महिला या स्वत:हा उमेदवार होत्या मात्र निवड प्रक्रीया गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आली व यात त्या पात्र ठरल्या नाही याच नैराश्यातुन त्यांनी खोटी तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून केल्या जाणार्या चौकशीत सत्य समोर समोर येईल, असे संस्थाध्यक्ष हाजी सत्तार खान यांनी सांगितले.
