कृउबा निवडणूक : भुसावळात चार तर यावलला 50 अर्जांची विक्री
Kriuba Election : Sale of 50 application forms in Bhusawal and four in Yaval भुसावळ : भुसावळसह यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून सोमवार व मंगळवारी दोन दिवसात भुसावळात चार तर यावलला 50 अर्जांची विक्री झाली मात्र अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळात चार अर्जांची विक्री
भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एक तर दुसर्या दिवशी मंगळवारी तीन अर्जांची विक्री झाली मात्र अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. 3 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 24 एप्रिलला निवडणूक होणार आहे. यामुळे 31 मार्चनंतर उमेदवारी अर्ज भरण्याला गती येणार आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी केवळ सोसायटी मतदार संघातून एकमेव अर्जाची विक्री झाली तर मंगळवारी याच गटातून पुन्हा एक अर्जाची विक्री झाली व ग्रामपंचायत मतदारसंघातून दोन अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत विरकर, बाजार समितीचे सचिव नितीन पाटील यांनी दिली.

यावलला एकही अर्ज प्राप्त नाही
यावल : यावल बाजार समितीच्या निवडणुकीत दुसर्या दिवशी एक ही अर्ज प्राप्त झाला नाही तर 42 अर्जांची झाली विक्री झाली. दोन दिवसात इच्छुकांनी 50 अर्ज घेतले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता 3 एप्रिलपर्यंत मुदत आहे. बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी निवडणूक होत असून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी बाजार समितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी थांबून आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सार्वत्रिक निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी मंगळवारी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. दोन दिवसात मात्र तब्बल 50 अर्जांची विक्री झाली आहे. पहिल्या दिवशी आठ तर दुसर्या दिवशी 42 अर्ज विक्री झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत मुदत आहे. बाजार समितीच्या सभागृहात नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एफ.चव्हाण, सहाय्यक एम.पी.भारंबे, डी.व्ही.ठाकूर, एस.डी.केदारे हे कामकाज पाहत आहेत.
