अत्याचारातून रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म : तरुणाविरोधात गुन्हा
A minor girl in Raver taluka gave birth to a child due to torture : Crime against youth रावेर : रावेर तालुक्यातील एका गावात राहणार्या 16 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्यानंतर तरुणी गर्भवती राहिली व तिने नुकताच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात पीडीतेच्या आईच्या तक्रारीवरून संशयित आरज्या (पूर्ण नाव नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्याचाराची घाबरून दिली नाही माहिती
रावेर तालुक्यातील एका गावात अंदाजे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. तिचे आईवडील हे ऊस तोडणीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. साधारण सात महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह बारामती तालुक्यातील फलटणजवळ उस तोडणीला गेल्यानंतर झोपडी करून वास्तव्यास होती. पीडीत मुलगी ही घरी झोपडीत एकटी असतांना संशयित आरज्या (पुर्ण नाव माहिती नाही) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. मुलीने घरात घाबरून कुणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर कुटुंबिय पुन्हा मुळ गावी रावेर येथे परत आले असता मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले. तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर तिने मुलाला जन्म दिला. याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
