कापूस खरेदीच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील शेतकर्यांना सहा लाखांचा गंडा : अज्ञात व्यापार्याविरोधात गुन्हा
6 lakhs to farmers of Jamner taluka through purchase of cotton: Crime against unknown trader पहूर : जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथील तीन शेतकर्याचा 77 क्विंटल कापूस खरेदी करून पैसे न देता परस्पर पसार झालेल्या एकाविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भामट्याने शेतकर्यांना सहा लाख 21 हजारांचा गंडा घातला आहे.
कापसाच्या खरेदीनंतर संशयित पसार
जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावात शेतकरी संजय गबरू राठोड, सुरेश राघो चव्हाण आणि ललित सोमा चव्हाण या तीन शेतकर्यांनी शुक्रवार, 24 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता एका व्यापार्याला 77 क्विंटल कापूस मोजून दिला. त्यापोटी सहा लाख 21 हजार रुपये मोजून घेऊन पैसे न देता वाहन घेवून संशयित बनावट नंबरप्लेट लावलेल्या वाहनातून पसार झाला. या संदर्भात संजय गबरू राठोड (42) रा. लोंढ्री ता. जामनेर यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार, 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.


