बँक खात्याशी तुमचा जुना मोबाईल क्रमांक कनेक्ट असल्यास तुमचीही होवू शकते फसवणूक : पाचोर्‍यातील महिलेला सव्वा तीन लाखांचा गंडा


A woman in Pachora was cheated of Rs. 3 lakh through checkbook and ATM card एरंडोल : एचडीएफसी बँकेच्या खातेदाराने जुना मोबाईल क्रमांक अपडेट न केल्याचा फायदा भामट्याने उचलत चेकबुक व एटीएमद्वारे तब्बल सव्वातीन लाखांचा गंडा पाचोर्‍यातील मूळ खातेदारास घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या मोबाईल क्रमांकाद्वारे केली फसवणूक
उत्राण येथील रहिवासी व हल्ली पाचोरास्थित स्विटी योगेश संघवी यांचे एचडीएफसी बँकेत खाते असून मंगळवार, 27 मार्च रोजी त्या बँकेत जावून चेकबुक संदर्भात विचारणा करण्यास गेल्यानंतर बँक मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी महिलेचे चेकबुक आणि एटीएम कार्ड हे कुरीअर वाल्याने बँकेच्या अकाऊंटला लिंक असलेल्या फिर्यादीच्या जुन्या मोबाईल क्रमांकावर फोन करून पाठवून दिले. याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने चेकबुक व एटीएमच्या मदतीने 21 मार्च ते 24 मार्च दरम्यान बँकेच्या खात्यातून परस्पर तीन लाख 19 हजार 516 रुपयांची रक्कम काढून घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने कासोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेहत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !