आमदगावच्या तरुण शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने शेतातच मृत्यू !


A young farmer of Amdgaon died in the field due to electric shock! बोदवड : तालुक्यातील आमदगाव येथील विशाल किसन पाचपांडे (30) या तरुण शेतकर्‍याचा इलेक्ट्रिक शॉक लागून शेतातच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 28 रोजी मध्यरात्री उघडकीस आली. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आमदगाव शिवारातील राकेश संजय पाटील यांच्या शेतातील मोटरीच्या इलेक्ट्रिक डीपी जवळ इलेक्ट्रिक मोटार सुरू कररण्यासाठी गेल्यानंतर विशाल पाचपांडे या शेतकर्‍याला शॉक लागला. विशाल पाचपांडे जमिनीवर खाली पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी बोदवड ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विलास ज्ञानदेव बर्‍हाटे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अय्युब तडवी हे करीत आहेत.

शेतकर्‍याच्या मृत्यूने हळहळ
बोदवड तहसीलदार यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. मृत विशाल पाचपांडे या तरुण शेतकर्‍याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशाल पाचपांडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात विशाल पाचपांडे यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !