भुसावळात चोरट्यांनी हार्ड वेअरचे दुकान फोडत आठ हजारांची रोकड लंपास


Thieves ransacked a hardware store in Bhusawal and looted cash worth eight thousand भुसावळ  : चोरट्यांनी गजबजलेल्या मॉडर्न रोडवरील बजाज हार्डवेअरचे कुलूप तोडून दुकानातून आठ हजारांची रोकड लांबवली. ही 24 ते 25 मार्चदरम्यान घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
राजकुमार मधू बजाज (पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांचे मॉडर्न रोडवर बजाज हार्डवेअर नामक दुकान असून ते गावाला गेल्याने दुकान बंद असल्याची संधी चोरट्यांनी 24 ते 25 मार्चदरम्यान साधली. चोरट्यांनी दुकानातून आठ हजारांची रोकड लांबवल्याची बाब उघडकीस आल्याने बजाज यांनी मंगळवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !