भुसावळातील स्टेट बँकेसमोरून पल्सर लांबवली
Pulsar pulled up in front of State Bank in Bhusawal भुसावळ : जामनेर रोडवरील आनंद नगर भागातील स्टेट बँकेसमोरून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांचे रॅकेट सक्रिय
कैलास चुनीलाल गायकवाड (54, यशोधन पार्क, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी पल्सर दुचाकी (एम.एच.19 डी.क्यू.7733) आनंद नगरातील स्टेट बँकेसमोर लावली असता मंगळवार, 27 रोजी रात्री साडेआठ ते नऊ दरम्यान चोरट्यांनी संधी साधून ती लांबवली. तपास नाईक तुषार पाटील करीत आहेत.
