Riots in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगरात दंगल : पोलिसांची वाहने जाळली ; हवेत गोळीबार, सहा जण जखमी


Riots in Chhatrapati Sambhajinagar : Police vehicles burnt; Firing in the air, six injured छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुर्‍यातील राम मंदिराच्या परिसरात मध्यरात्री काही समाजकंटकांनी गोंधळ घातल्यानंतर दोन गटात वाद होवून त्याचा परीणाम दंगलीत (Riots in Chhatrapati Sambhajinagar ) झाला. जमावाने दगडफेक सुरू केली जाळपोळ केल्याने पोलिसांची वाहने पेटवण्यात आली. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या तर हवेतही गोळीबार करण्यात आला. जमावाला पांगविण्यासाठी ही पाऊले उचलल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

पहाटे परीस्थिती नियंत्रणात
आझाद चौक परिसरात जमाव मोठ्या संख्येने जमला होता. पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने परिस्थीती हाताळली. मोठा फौजफाटा तैनात करत पहाटे पाच वाजेपर्यंत परीस्थिती आटोक्यात आणली. यासाठी जमावाला शांत करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे प्रयत्न करत होते. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात तणावपूर्ण शांतता असून सध्या सर्वजण रामनवमी उत्सवात सहभागी होण्याची तयारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.






राज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन
आज रामनवमी आहे. हिंदू धर्मात आनंदचा सण आहे. शहराचे वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वांनी भूमिका पार पाडली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !