शौचासाठी शेतात गेलेल्या तरुणाचा हिंस्त्र प्राण्याचा हल्ल्यात मृत्यू : पाचोरा तालुक्यात खळबळ


A young man from Sarva died after being attacked by a wild animal पाचोरा : शौचासाठी शेतात गेलेल्या तरुणावर हिंस्त्र प्राण्याने मध्यरात्री हल्ला केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील खाजोळा गावाजवळील सार्वे बुद्रुक येथे घडली. बुधवारी रात्री 10 वाता मोबाईल लोकेशनव्दारे मृतदेह शोधण्यात यश आले. सुजीत डिगंबर पाटील (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी जाऊन वन विभागाने पंचनामा केला असून अहवाल वरीष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे वनविभागाचे ए.एस.मुलाणी म्हणाले.

शौचालयास गेल्यानंतर हिंस्त्र प्राण्याचा हल्ला
पाचोरा तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील (27) हा बुधवार, 29 रोजी पहाटे 8.30 वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता तर सुजितचे आई-वडील हे हतनूर, ता.कन्नड येथे सुजितच्या आजोंबाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. ते रात्री परत आल्यानंतर सुजित हा घरी आढळून न आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला तर मोबाईल सुजित उचलत नसल्याने नगरदेवळा दुरक्षेत्र गाठुन पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान पोलिस पथक सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेत असतांना गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोबाईल वाजला व शौचालयाचे भांडे ही काही अंतरावर आढळून आले. सुजीतच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्त्र प्राण्याने लचके तोडल्याचा मोठमोठ्या जखमा आढळून आल्या. सुजित हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. मृतदेह पाहताच कुटुंबियांनी आक्रोश केला.

गावात शोककळा
मयत सुजितने मराठी, इंग्रजी टायपिंग, स्टेनो असे विविध कोर्स पूर्ण केले होते. तो पदवीधर असल्याने व 40 टक्के अपंग असल्याने नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. सुजितच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परीवार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. सुजित हा अतिशय हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !