जळगावात चालकाची बेपर्वाई : हॅण्ड काँक्रीट मिक्सर मशीन रीव्हर्स घेताना मजूर ठार
Driver negligence in Jalgaon : Laborer killed while reversing hand concrete mixer machine Driver negligence in Jalgaon : Laborer killed while reversing hand concrete mixer machine जळगाव : रस्ता काँक्रिटीकरण काम सुरू असताना हॅण्ड काँक्रिट मिक्सर असलेले वाहन मागे घेताना चाकाखाली आल्याने 44 वर्षीय प्रौढाचा दबले जावून मृत्यू ओढवला. ही घटना गुरुवार, 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पिंप्राळ्यातील स्मशानभूमीजवळ घडली. अरुण वसंत बाविस्कर (44, कांचन नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
अरुण वसंत बाविस्कर हे पत्नी व मुलासह शहरातील कांचन नगरातील उज्ज्वल चौकात वास्तव्याला होते. बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींग काम करून ते उदरनिर्वाह करीत होते. जळगाव शहरातील पिंप्राळा स्मशानभूमीजवळील खुल्या जागेवरील रस्ता काँक्रिटीकरणस्थळी गुरुवारी सकाळी 10 वाजता काम सुरू असताना हॅण्ड काँक्रीट मिक्सर वाहन (एम.एच. 19 डी.यू.4661) वरील चालक संजय राठोड (रामदेववाडी, जळगाव) याने वाहन मागे घेताच अरुण बाविस्कर हे मागच्या चाकाखाली येताच दबले जावून त्यांचा मृत्यू ओढवला. ही घटना घडल्यानंतर चालक हा पसार झाला. सोबत असलेल्या कामगारांनी तातडीने मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात चालक संजय राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी सविता, तीन विवाहित मुली आणि सात वर्षाचा मुलगा शैलैश असा परीवार आहे.
