भुसावळातील वसंत कोलते यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान


Vasant Kolte from Bhusawal honored with ‘Jivab Gaurav’ award भुसावळ  : जामनेर तालुक्यातील अंबीलहोळ येथील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते भुसावळातील वसंत कोलते यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर असणार्‍या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो.

कार्याची दखल घेत पुरस्कार
वसंत कोलते यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सध्या कोलते हे तेजोदिप नवविचार फाऊंडेशन, नाशिकचे सचिव म्हणून गेल्या पाच वर्षांपासून काम पहात आहेत. त्यांच्या संग्रहीत सुविचार धन पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत तसेच ते गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात, ग्रामीण भागात विविध समाजोपयोगी जनजागृती पत्रके वाटप करून अनेकांना हालाखीच्या व्यवस्थेतून बाहेर काढण्यात मदत केली आहे शिवाय नाशिक, जळगाव, पुणे, मुंबई व विदेशात अर्थाजनासाठी जाण्याकरिता अनेकांना त्यांनी उद्युक्त केले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये ते पत्रकारीरतेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले असून गेल्या 19 वर्षांपासून वेगवेगळ्या फाऊंडेशन, सामाजिक मंडळांवर जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. वसंत कोलते यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांच्याव शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !