रावेर शहरात विवाहितेची गळफास घेेत आत्महत्या


Married woman commits suicide in Raver city रावेर : रावेर शहरातील प्राजक्ता भरतकुमार पाटील (उमरेडा, जि.नागपूर, ह.मु.वासुदेव नगर, विद्या नगरजवळ रावेर) यांनी गुरुवारी गळफास घेतला. रावेर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रावेर शहरातील वासुदेव नगरातील रहिवासी सीताराम काशिनाथ पाटील यांची कन्या प्राजक्ताचे उमरेड येथील भरतकुमार पाटील याच्याशी विवाह झाला होता. विवाहिता माहेरी आल्यानंतर आई-वडील चिनावल येथे गेल्यानंतर विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरुमधील छताच्या लोखंडी कडीला साडीने गळफास घेतला. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, एपीआय शितलकुमार नाईक, उपनिरीक्षक दीपाली पाटील, विशाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.


कॉपी करू नका.