जळगावजवळ जबरी लूट : तरुणाच्या मित्रासह तिघांना अटक

एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याची 48 तासात उकल


MIDC police solved the crime within 48 hours जळगाव : चाकूच्या धाकावर दुचाकी अडवत तरुणाच्या गळ्यातील चैनसह 17 हजारांचा मुद्देमाल लुटण्यात आल्याची घटना एमआयडीसी हद्दीत मंगळवारी रात्री घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपासचक्र फिरवत तक्रारदाराच्या मित्रासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

तिघा आरोपींना अटक
अभिषेक जगन्नाथ निंभोरे (24, रा.किसनराव नगर, जळगाव) हा त्याचा मित्र साहिल कासार यांच्यासोबत मंगळवार, 28 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जळगाव- शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉन्सजवळून दुचाकीने जात असतांना दोन जणांनी त्यांची दुचाकी अडवत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून मोबाईल आणि चांदीची गळ्यातील चैन असा एकूण 17 हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरी हिसकावला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या अभिषेक निंभोरे यांचा मित्र साहिल विजय कासार (23, सिंधी कॉलनी, जळगाव) यानेच त्याचे साथीदार भोला अजय सरपटे (22, नवल कॉलनी) आणि आतीष नरेश भाट (23, कंजरवाडा, जळगाव) यांच्या मदतीने लुटमार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी तिघांनी गुरूवारी दुपारी अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !