चोरट्यांनी मंदिराची दानपेटीच लांबवली : बहाळपूरात खळबळ
Thieves stole the donation box of the temple: excitement in Bahalpur पारोळा : पारोळा तालुक्यातील बहाळपूर येथील बालाजी मंदिरातील दानपेटीने चोरट्यांनी लांबवल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा मंदिरांकडे
पारोळा तालुक्यातील बहाळपूर येथे श्री बालाजी महाराजांचे मंदिर असून बुधवार, 29 मार्च रोजी रात्री 9 ते 30 मार्च रोजी सकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरातातील दानपेटी लांबवली. पहाटे साडेसहा वाजता शेतकरी सुभाष नामदेव पाटील मंदिरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुभाष पाटील यांनी पारोळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण पारधी करीत आहे.
