Electricity consumers in the state are shocked by the price hike राज्यात वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक
Electricity consumers in the state are shocked by the price hike
मुंबई : महावितरणकडून यापूर्वीच वीज दरवाढीचे संकेत देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात 1 एप्रिलपासून राज्यात विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणची याचिका मंजूर केली आहे. 2023-24 मध्ये वीजदरात 2.9 टक्के व वर्ष 2024-25 मध्ये 5.6 टक्के वीज दरवाढ झाल्याचा महावितरणचा दावा असलालतरी ही दरवाढ यापेक्षा कितीतरी अधिक पटीने झाल्याचे सांगितले जात आहे
मुदत संपताच झाली दरवाढ
आता विजेचे दर बहुवार्षिक पद्धतीने निश्चित केले जाते. आयोगाने 15 वर्षांसाठी 2020 साली वीजदर निश्चित केले होते. अडीच वर्षांपर्यंत यात कुठलेही संशोधन करता येऊ शकत नाही. आता ही मुदत संपताच महावितरणने दरवाढ याचिका दाखल केली होती. महावितरणने याचिकेत 67 हजार 643 कोटी रुपयाच्या महसूल भरपाई वीज बिलामार्फत करण्याची विनंती केली होती, परंतु आयोगाने 39 हजार 567 कोटी रुपयेच मंजूर केले. मात्र, महावितरणच्या विनंतीनुसार इंधन समायोजन शुल्क मागच्या वर्षाच्या दरात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जितकी दरवाढ झाली, तितकी ती कागदावर दिसून येत नाही आहे. उन्हाळ्यात लोडशेडिंग थांबविण्यासाठी खरेदी करण्यात आलेली महागडी वीज, कोळसा आदींवरील खर्च या शुल्काच्या माध्यमातून वसुल केले जात आहे. जर वर्ष 2000 मधील दरानुसार विचार केला, तर ही दरवाढ 12 ते 36 टक्क्यांपर्यंत झाली आहे. असे असले, तरी ही दरवाढ केवळ नाममात्र असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे.

बीपीएल व कृषी ग्राहकांना फटका
0 ते 30 युनिटपर्यंत वीज वापर करणार्या बीपीएल ग्राहकांना आता अधिक पैसे द्यावे लागतील. या श्रेणीमध्ये जवळपास 10 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे शेतकर्यांना आता 16 ते 26 टक्के अधिक पैसे द्यावे लागतील.