रेल्वे झाली मालामाल : भुसावळ विभागाला वर्षभरात 1570 कोटींची कमाई
Railway became rich : Bhusawal division earned 1570 crores in a year भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागाने गतवर्षाच्या तुलनेत यंदा घसघशीत कमाई केली असून गतवर्षाया तुलनेत 29 टक्यांची वाढ होवून यंदा 1570.41 कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे. गतवर्षी हेच उत्पन्न 1220.67 कोटी होते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस.केडीया, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाच्या कर्मचार्यांनी फुकट्या प्रवाशांना आळा बसण्यासाठी विशेष मोहिम राबवीत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला. मेल एक्स्प्रेस या गाड्यांचे उत्पन्न गतवर्षी 451 कोटी होते ते यंदा 743 कोटी झाले तर माल वाहतुकीतून गेल्या वर्षी 611.51 कोटी कमाई झाली असताना यंदा ती 707 कोटी रुपये झाली आहे. गतवर्षी भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकावरून 5.84 दशलक्ष ट्रेन लोडींग झाले ते यंदा 6.28 दशलक्ष टन माल लोड करण्यात आला. गेल्यावर्षी तिकीट तपासणीमध्ये 62 कोटी 61 लाख रुपये दंड प्राप्त झाला होता मात्र यंदा 13 टक्यांची वाढ होऊन हे उत्पन्न यंदा 71 कोटींच्या घरात पोहोचले आहे.
सात मेगा ड्राईव्हचा परीणाम
रेल्वेतून फुकटे प्रवासी जास्त प्रवास करीत असल्याने यासाठी वाणिज्य विभागातर्फे फुकट्या प्रवाशांना आळा बसविण्यासाठी सात मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या अचानक तपासणी मोहिमेतून एक कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली. यावेळी 16 हजार 879 तिकीट न काढता प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला तर विविध तपासणी मोहिमेत पाच तिकीट देणार्या दलालांवरही कारवाई करण्यात आली. 9.14 लाख प्रवाशांकडून एकूण 71 कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

केटरींग स्टॉल कमाईत 213 टक्के वाढ
रेल्वेतर्फे दिल्या ाणार्या कॅटरींगच्या ठेक्यात सुध्दा यंदा चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कॅटरींगच्या ठेक्यातून रेल्वेला दोन कोटी 56 लाख रूपये मिळाले होते तर यंदा आठ कोटी तीन लाख रुपयांचे उत्प्पन्न मिळाले आहे. नॉन फेअर उत्पन्नातून गेल्या वर्षी एककोटी 11 लाख रुपये मिळाले होते तर यंदा 5 कोटी 30 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असून गतवर्षाच्या तुलनेत 377 टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे.
पार्कीगमध्ये 277 टक्के वाढ
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकावरील पार्कीगच्या माध्यमातून सुध्दा रेल्वे प्रशासनाला यंदा मोठाच फायदा झाला आहे. गेल्या वर्षी एक कोटी 7 लाखाचे उत्पन्न मिळाले होते, यंदा मात्र त्यात वाढ होऊन चार कोटी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी किसान पार्सल गाड्यामुळे रेल्वे प्रशासनाला चांगलाच लाभ झाला होता. यंदा मात्र किसान गाड्या नसल्याने त्यांचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी 101 कोटी 44 लाख रूपये रूपये मिळाले होते तर यंदा 41 कोटी 35 लाख रुपयांची कमाई आली असून यात 59. 25 टक्के घाटा आला आहे तर रेल्वेची एक कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची होती, ती केवळ 49 लाख रुपयेच वसुल करता आली आहे.