Former MLA Santosh Chaudhary acquitted in Bhusawal extortion case भुसावळातील खंडणी प्रकरणात माजी आमदार संतोष चौधरींची निर्दोष सुटका

जळगाव सत्र न्यायालयाचा निकाल : निवडणुका लढण्याचा मार्ग मोकळा


Former MLA Santosh Chaudhary acquitted in Bhusawla extortion case भुसावळ : भुसावळातील माजी आमदार संतोष चौधरी यांची 15 लाखांच्या खंडणी प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती अ‍ॅड.सागर चित्रे यांनी दिली. दरम्यान, चौधरी यांची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याने आगामी काळात त्यांना सर्व निवडणुका लढण्याचा मार्ग मोकळा झाला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

शिक्षेविरोधात केले होते अपिल
ले आऊट एन ए करण्यासाठी एक कोटींची खंडणी मागून सुरूवातीला 15 लाखांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी भुसावळातील माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांना जुलै 2011 मध्ये जळगाव एलसीबीने ट्रॅप करीत अटक केली होती. या गुन्ह्यात चौधरींसह पाच संशयीतांचा समावेश होता. जळगाव सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर माजी आमदार चौधरी यांना केसच्या काळात जामीन मिळाला नसल्याने दोन वर्ष 19 दिवस त्यांनी शिक्षा भोगली व शिक्षे विरोधात त्यांनी अपिल केल्यानंतर बुधवार, 5 एप्रिल रोजी त्यांची न्या.डी.एन.खडसे यांनी निर्दोष सुटका केली. दरम्यान, ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना माजी आमदार चौधरी म्हणाले की, न्याय देवतेवर आपला पूर्ण विश्वासं होता व आपल्याला न्याय मिळाला आहे.

कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह
माजी आमदार चौधरी यांनी शिक्षा भोगल्याने त्यांना कुठल्याही निवडणुकीत सहभागी होता येत नव्हते मात्र आता चौधरी यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दुणावला आहे. आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका पाहता चौधरी आता अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे शिवाय पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे चौधरी हेच उमेदवार राहण्याचीदेखील अधिक शक्यता आहे. चौधरींची निर्दोष सुटका झाल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साह संचारला आहे हेदेखील तितकेच खरे !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !