नवर्‍याला सोडून विवाहिता प्रियकरासोबत पसार : बोदवड तालुक्यातील घटना


A married woman leaves her husband and moves in with her boyfriend : incident in Bodwad taluka बोदवड : सप्तपदी चालून जन्मोजन्मी सोबत चालण्याच्या आणाभाका घेतलेली विवाहिता सात वर्षांचा संसार सोडत प्रियकरासोबत पसार झाली. बोदवड तालुक्यातील एका गावातील माहेर असलेल्या विवाहिता हरवल्याबाबत बोदवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

माहेरी येताच विवाहिता पसार
बोदवड तालुक्यातील एका गावात 27 वर्षांच्या विवाहितेचे माहेर असून ती माहेरी आल्यानंतर गावात येत असलेल्या एका तरुणासोबत तिचे सूत जुळले. तिने कुठलाही विचार न करता त्याच्यासोबत निघून गेली. माहेरी आली असताना ती घरी नाही, हे पाहून तिच्या भावाने शोधाशोध केली. मात्र, तरीही ती सापडली नाही. अखेर तिच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास संदीप वानखेडे हे करत होते. दुसर्‍या घटनेत शहरातील 30 वर्षीय महिलेने मुलांचा विचार न करता अशाच पद्धतीने प्रियकराचा हात धरून गाव सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !