यावलला दिड वर्षीय बालिकेने पाणी समजून प्यायले कारपेट प्रकृती गंभीर


In Yavala, a one and a half year old girl mistook water and drank the carpet : critical condition

यावल : शहरातील इस्लामपुरा भागातील एका दिड वर्षीय बालिकेने घराबाहेर एका बॉटलमध्ये असलेले कारपेट पाणी समजून प्राशन केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामिण रुग्णालयात हलवण्यात आले व प्रथमोपचार करून तिला जळगावी हलवण्यात आले.

पाणी समजून पिले कारपेट
शहरातील इस्लामपूरा भाग एका घराच्या पेंटींग चे काम सुरू होते व या घराशेजारील रहिवासी लहान बालके तेथे खेळत होती. यातच मुशीराबी शेख शकील या दिड वर्षीय बालिकेने एका बॉटलमध्ये असलेले कारपेटला पाणी समजून पिल्यानंतर तिला त्रास होवू लागताच ती रडायला लागली. हा प्रकार निर्दशनास येताच तिला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ.सचिन देशमुख, डॉ.इरफान खान, अधिपरीचारीका ज्योत्ना निंबाळकर, सुमन राऊत, कादर तडवी, अमोल अडकमोल आदींनी प्रथमोपचार केले व बालिकेची प्रकृती बिघडल्याने तिला जळगावी हलवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !