संतापजनक ! : द़ृष्टीहिने विवाहितेवर पतीसमोरच नराधमाचा बलात्कार


A blind woman was raped in front of her husband in Akola अकोला : द़ृष्टीहिन दाम्पत्याने रस्ता विचारल्यानंतर नराधम आरोपीने विवाहितेवर पतीसमक्षच अत्याचार केल्याची संतापजनक घटना अकोल्यात घडली. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू करीत त्याच्या मुसक्या बांधल्या.

मुलीला भेटायला जाताना ओढवला दुर्दैवी प्रसंगी
दृष्टीबाधित दाम्पत्यांना एक मुलगी असून ती अकोला तालुक्यातील आजीकडे वास्तव्यास असून अमरावती जिल्ह्यातील एका गावातील दाम्पत्य 31 मार्च रोजी अकोला येथे आल्यानंतर रात्री पावणेआठ वाजेच्या दरम्यान अकोला बसस्थानकावर उतरले. पीडित महिलेने अनोळखी व्यक्तीला बसस्थानकाबाहेर जाण्याचा रस्ता विचारला असता एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हात धरून बाहेर आणले. त्यानंतर तो त्यांना जुन्या बसस्थानकावर घेऊन गेला. मात्र ज्या गावाला जायचे होते त्या गावात रात्री वादळवारा असल्याने त्यांनी रात्र रेल्वेस्थानकावर काढण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला रेल्वेस्थानकावर सोडून देतो, असे म्हणून त्याने त्यांना ऑटोरीक्षात बसवले व रेल्वेस्थानकाच्या जवळच अज्ञात ठिकाणी नेले. त्यानंतर त्याने महिलेला पतीपासून थोडे दूर केले आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्यांना रेल्वेस्थानकावर सोडून दिले. घाबरलेल्या अवस्थेत दोघेही गावी गेले असता त्यांनी आपबिती सांगितल्यावर सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठत त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

फुटेजवरून आरोपीला पकडले
पोलिसांनी लगेच घटनेचा तपास सुरू केला. बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज, तसेच बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज काढून आरोपीची ओळख पटवत काही तासाच्या आतच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भाऊराव घुगे यांनी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !