मनुदेवी तीर्थक्षेत्र परीसरात अमळनेरच्या इसमाचा मृतदेह आढळला


The dead body of Isma of Amalner was found in the vicinity of Manudevi shrine यावल : आडगाव जवळील श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिराच्या परीसरात तलावाच्या बाजूला एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयताचा मृत्यू कसा झाला ? हे स्पष्ट झाले नाही. मयत हा ताडेपुरा, अमळनेर येथील असून तो दर्शनार्थ आल्याची माहिती आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत्यूचे कारण अस्पष्ट
आडगाव येथून पाच किमी अंतरावर श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिर असून मंदिरापासून दीड किलोमीटर अंतरावर तलावाच्या बाजूला मंदिरात दर्शना करीता आलेल्या आत्माराम सुखदेव धनगर (35, ताडेपुरा, अमळनेर) यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणल्यानंतर यावल पोलिसात नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !