नांदवेल जंगलातील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त
Encroachment in Nandvel forest finally destroyed the land कुर्हाकाकोडा : वाघाचा अधिवास असलेल्या वडोदा-डोलारखेडा हद्दीतील नांदवेलच्या जंगलातील सुमारे दहा वर्षांपासून झालेले अतिक्रमण अखेर जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले. दहा वर्षांनंतर का होईना वन हद्दीतील अतिक्रमण निर्मूलन झाल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. वढोदा वनपरीक्षेत्र हद्दीतील नांदवेल शेती शिवाराला लागून असलेल्या वनहद्दीत सुमारे दहा वर्षांपूर्वी आदिवासी कुटुंबांनी अतिक्रमण केले होते. कक्ष क्रमांक 571 मध्ये ग्यानसिंग वेलजी बारेला यांच्यासह 33 जणांनी सुमारे 1 हे 60 आर क्षेत्रावर अतिक्रमण करून 30 झोपडया व एक अर्धवट बांधकाम केलेली इमारत बांधली होती. या संदर्भात 2017 मध्ये नांदवेल गटाचे तत्कालीन जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील यांनी लेखी तक्रारदेखील केली होती. त्यानंतर ठोस कारवाई करण्यास मात्र वर्ष 2023 उजाडले.
33 झोपड्या जमीनदोस्त
2012- 2013 या कालावधीत वनजमिरनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. हा परीसर दक्षिण डोलारखेडा बिटला लागून आहे. पट्टेदार वाघाच्या अधिवासाला सर्वात जास्त पोषक असलेला हा परीसर असताना सलग दहा वर्षे आदिवासी या ठिकाणी अतिक्रमण करून वास्तव्यास होते. निलेश पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर भूमी अभिलेख आणि वनविभागाने संयुक्तपणे मोजणी करून हद्द निश्चित केली व जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण निर्मूलन केले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई उपसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उप वनसंरक्षक उमेश बिराजदार, वढोदा वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल कृपाली शिंदे, गस्ती पथकाचे वनपाल योगेश दीक्षित, डोलारखेडा वनपाल गणेश गवळी, दिगंबर पाचपांडे, मराठे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचार्यांनी केली.