म्हैसवाडी येथे वीज चोरी : चौघांविरोधात गुन्हा दाखल
Electricity theft in Mhaiswadi : Case registered against four यावल : यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे वीज चोरी विरोधात मोहिम राबवल्यानंतर चौघे आढळल्यानंतर त्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
वीज वितरण कंपनीच्या फैजपूर उपविभाग अंतर्गत बामणोद कक्षाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र भंगाळे यांनी आपल्या पथकासह म्हैसवाडी या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. गावातील प्रवीण निंबादास कोळी, ज्ञानेश्वर बारसू कोळी, रामचंद्र देवचंद कोळी व संदीप पंडित कोळी हे वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना दंडाच्या संदर्भात नोटीसा बजवण्यात आल्या व दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र या चौघांनी दंड न भरल्याने चार जणाविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
