मनुरला वेगवेगळ्या घटनेत आग : 56 हजारांचे नुकसान


बोदवड : तालुक्यातील मनुर बु.॥ येथे शेतातील मक्याला आग लागल्याने तसेच दुकानाला आग लागल्याने सुमारे 56 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

दोन ठिकाणी लागली आग
हा प्रकार 5 ते 6 एप्रिलदरम्यान घडला. कैलास सत्रे यांच्या शेतात वीज तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून सुमारे सहा हजारांचा मका खाक झाला तर दुसर्‍या घटनेत निखील भास्कर धनगर (23) या तरुणाच्या दुकानातील संगणक, प्रिंटर, लॅमीनेशन मशीन व मोबाईल असे एकूण 50 हजारांचे नुकसान झाले. तपास नाईक संदीप झरवाल करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !