पोहण्यासाठी तापी पात्रात गेलेल्या अकोल्यातील तरुणाचा भुसावळात दुर्देवी मृत्यू
A young man from Akola, who had gone to swim in a tapi vessel, died tragically in Bhusawal भुसावळ : तापी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या अकोल्यातील 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेपूर्वी घडली. करण उर्फ सागर शिवशंकर अटवाल (22, अकोला) असे मयताचे नाव आहे. करण हा शहरालगतच्या कंडारी येथील नागसेन कॉलनीत जाऊळाच्या कार्यक्रमास आला होता व पोहण्यासाठी गेल्यानंतरही ही दुर्घटना ओढवली.
कपारीत अडकल्याने तरुणाचा मृत्यू
नागसेन कॉलनीतील सुरेश हटकर यांच्याकडे जाऊळाच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर करण हा कंडारीजवळील तापी नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. ही बाब लक्षात आल्यानंतर तरुणाला बाहेर काढण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. शहर पोलिस ठाण्यात पोलिस पाटील रामा तायडे यांनी माहिती देताच निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौधरी, पोलिस कर्मचारी राहूल भोई व पोलिस कर्मचारी यांनी धाव घेतली. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात सुरेश बाबुराव हटकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
