भुसावळ शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांचा भाजपात प्रवेश


भुसावळ : भुसावळ शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांच्यासह अनेकांनी रविवारी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपचे माजी नगरसेवक सतीश सपकाळे, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, अजय नागराणी, निक्की बत्रा, गिरीष महाजन, देवा वाणी आदींसह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

वरीष्ठांनी डावलल्यानेच भाजपात प्रवेश
2006 पासून शाखाप्रमुख ते विभागप्रमुख असे काम केलेल्या भुसावळातील श्रीनगर भागातील अमोल पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. सक्रिय कार्य करतांना नागरीकांच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. आरोग्य सेवा असो शासकीय लाभ त्यांनी नागरीकांना मिळवून दिला आहे. याप्रसंगी आमदार संजय सावकारे सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

पक्षाच्या कार्यकारणीतील वरीष्ठ पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी डावल्यामुळे सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळत नाही, अनेक शिवसैनिक नाराज आहेत. बर्‍याच वेळेस वरीष्ठ पदाधिकार्‍यांना कळविले परंतु त्यांनी समाधान केले नाही, पक्ष सोडतांना दुःख होत आहे. अशीच परीस्थिती राहिल्यास अनेक कार्यकर्ते पक्ष सोडू शकतात, असे अमोल पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी धनेश पाटील, गिरीश राणे, महेश कोळी, राहुल भोई, शुभम पाटील, प्रशांत वारके, ऋतिक कोळी, बबलू सोनवणे, बंटी कोळी, कैलास भोई, चंद्रकांत सपकाळे यांनीही भाजपात प्रवेश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !