प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय : दहिगावच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा


Suspicion on the character of the wife who had a love marriage: A case against three including the husband of Dahigaon यावल : तालुक्यातील दहिगाव येथील 21 वर्षीय विवाहितेचा प्रेमविवाह केलेल्या पतीकडून चारीत्र्यावर संशय घेऊन छळ करण्यात आला तसेच दारू पिऊन तिला मारहाण करण्यात आली. यावल पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह तिघांविरोधात गुन्हा
दहिगाव, ता.यावल येथील नेहा योगेश महाजन (21) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिने योगेश प्रेमचंद महाजन यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह केल्यानंतर पती योगेश महाजन याने विवाहितेच्या चारीत्र्यावर संशय घेत दारू पिऊन तिला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली तसेच सासू साधना प्रेमचंद महाजन, जेठ सेजल प्रेमचंद महाजन या दोघांनी देखील तिचा छळ केला. यावल पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती योगेश महाजन, सासू साधना महाजन व जेठ सेजल महाजन या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !