वीज चोरीनंतर दंड भरण्यास ‘ना’ : रावेरच्या एकाविरुद्ध गुन्हा


‘No’ to pay fine after electricity theft: Crime against one of Raver यावल : रावेर शहरात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. उटखेडा रस्त्यावर एक जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यास वीज चोरीप्रकरणी दंडात्मक नोटीस बाजवण्यात आली मात्र दंड भरण्यात न आल्याने त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वीज चोरी प्रकरणी अखेर गुन्हा
रावेर शहरात राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी पथकासह शहरात गोपाल नगर भागात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली. हैदर खान महेबूब खान हा व्यक्ती वीज चोरी करतांना आढळल्याने वीज चोरी केलेल्या वीज युनिटप्रमाणे त्यांना 18 हजार 843 रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली व तातडीने दंड भरण्याची सूचना देण्यात आल्या मात्र त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्या आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !