भुसावळातील दक्षिण भागाला दोन दिवस उशिराने मिळणार पाणी


भुसावळ : गडकरी नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने मेन रायझींगला लोखंडी पुलाजवळून गडकरी नगर जलकुंभाला जोडणीचे नियोजन केले असून सोमवारी हे काम होणार आहे. या कामामुळे शहराच्या पाणीपुरवठा रोटेशनमध्ये बदल झाला असून सोमवारी सिंधी कॉलनी पाणीपुरवठा होणार नाही तो मंगळवारी होईल शिवाय शहरातील दक्षिण भागाला दोन दिवस उशिराने पाणी मिळणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याचे रोटेशन बदलले
शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभ भरण्यात येतो मात्र त्यानंतरही गडकरी नगरात कमी दाबाने पाणी येत असल्याने आता लोखंडी पूलाच्या परीसरात मेन रायझींगला जोडणी करुन गडकरी नगर जलकुंभ भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी हे काम होणार असून एकाच दिवसात काम करण्याचे नियोजन आहे. परीणामी गडकरी नगरच्या टाकीवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा हा दोन दिवस उशिराने होणार असल्याने पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा अभियंता संदीप देशमुख यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !