मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला


Big News: National Party status of NCP removed नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीसोबत पश्चिम बंगालमधील सत्ताधरी तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(उझख) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेल्या पक्षांची राष्ट्रीय स्तरावर मतदान टक्केवारी सहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे या तिन्ही पक्षांना मोठा झटका बसला आहे.

1999 मध्ये पक्षाची स्थापना
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 20 जून 1999 साली झाली. पुढच्या वर्षभरात म्हणजेच 10 जानेवारी 2000 रोजी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. पक्षाने पुढची 13 वर्ष कसून मेहनत केली. लोकप्रतिनिधी निवडून आणण्यावर भर दिला. पण देशात मोदी लाट आली आणि शरद पवारांचा करीश्मा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कमी झाला. पुढची नऊ वर्ष पक्षाची कामगिरी डळमळीत होत गेली. 2014 नंतरच्या कामगिरीमुळे तर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात आला. नागालँडचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन सुद्धा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकत नाही, असे नमूद करत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

राष्ट्रवादी ठरणार आता प्रादेशिक पक्ष
लोकसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना आणि त्यादृष्टीने सर्वपक्षीयांची तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादीसह तृणमुल काँग्रेस, सीपीआयला निवडणूक आयोगाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. ाष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे देशभरात पॉवरफुल्ल कामगिरी करणार्‍या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !