साकळी गावात गावठी दारूची विक्री : महिलेविरोधात गुन्हा


यावल : तालुक्यातील साकळी गावात अवैधरीत्या गावठी दारू प्लास्टिकच्या पन्नीत भरून विक्री करताना वृद्ध महिलेवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दारू विक्री करताना कारवाई
साकळी गावातील शेवंताबाई टोपलू सुरवाडे या अवैधरीत्या 14 लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करून प्लास्टिकच्या पन्नीत विक्री करण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या पथकाला मिळून आल्या. त्यांच्याकडून 14 लिटर दारू जप्त करण्यात आली. सीमा चिखलकर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !