पाचोरा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या


पाचोरा : सतत्याच्या नापिकीमुळे वाढत असलेल्या कर्जाच्या डोंगरानंतर पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील शेतकर्‍याने विषारी औषध सेवन करीत आतहत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान या शेतकर्‍याची प्राणज्योत मालवली आहे. रवींद्र ओंकार चव्हाण (44, तारखेडा, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.

नापिकीला कंटाळत विष प्राशन
रवींद्र चव्हाण यांनी सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर शनिवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले परंतु उपचारादरम्यान सोमवार, 10 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मलावली. चव्हाण हे तारखेडा येथील रहिवासी असून थोडीश्या शेतजमिनीत राबूनही उत्पन्नात आलेली घट व आलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व त्यातच मुलगीचे वय लग्नाचे झाल्यानंतर त्याबाबतच्या चिंतेत वैफल्य आल्याने त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे करीत आहे. मयत चव्हाण यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, वडील असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !