सावद्यात तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने साडेआठ लाखांची रक्कम लाटली


 

The then branch manager stole an amount of eight and a half lakhs in the loan सावदा : कर्जदारांकडील व्याजासह मुळ वसुलीची रक्कम साडेआठ लाख करून त्याचा भरणा न करता कर्ज भरल्याचे बनावट दाखले बनवण्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावदा मर्चंट पतपेढीचा तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी (सावदा) याच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

रेकॉर्डही ठेवले स्वतःच्या ताब्यात
सावदा मर्चंट क्रेडीट को.ऑपरेटीव्ह सोसायटीत अ‍ॅड.राहुल प्रकाश मुजूमदार (42, सागर पार्क, जळगाव) यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीचे तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी यांना अनेकदा पतसंस्थेचे तत्कालीन काळातील दप्तर (रेकॉर्ड) मागण्यात आले मात्र त्यांनी ते दिले नाही. या बाबत उपनिबंधक कार्यालयात पडताळणी केल्यानंतर कर्जदारांना बनावट दाखले दिल्याचा प्रकार उघडकीस आला शिवाय कर्जदार पुनाजी इंगळे, अनुसया इंगळे, स्व.राम इंगळे, किर्ती इंगळे, विजय पाटील व खुशाल चोपडे यांच्याकडील कर्जासह व्याजापोटी साडेआठ लाखांची वसुली आरोपी वाणी यांनी केल्याचे स्पष्ट झाले व आरोपीने कर्जदारांना कर्ज वसुलीचे बनावट दाखले दिल्याचे उघड झाला व हा सर्व अपहार हा सर्व अपहार 2012 ते 2013 दरम्यान घडला. या प्रकरसणी रवींद्र रमेश वाणी यांच्याविरोधात सोमवारी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंद पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !