फोटो फ्रेमची ऑर्डर देण्याच्या नावाखाली खडका गावातील विवाहितेला सव्वा लाखांचा गंडा


In the name of ordering a photo frame, a married woman from Khadka village was extorted for half a lakh भुसावळ : तालुक्यातील खडका येथील 22 वर्षीय विवाहितेला फोटो फे्रमची ऑर्डर देण्याच्या नावाखाली भामट्यांनी ऑनलाईन एक लाख 20 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुपण स्कॅन करताच लांबवली रक्कम
माधुरी मयूर पाटील (22, खडका, ता.भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, दोन संशयीतांनी 6 एप्रिल रोजी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून 15 फोटो फ्रेमची ऑर्डर दिली. या कामाचे माधुरी पाटील संशयीतांना 20 हजार 495 रुपये झाल्याचे सांगून पेमेंट मागितले असता संशयीतांनी त्यांना कुपण पाठवून ते स्कॅन करण्यास सांगितले व त्यातून तुम्हाला डबल पेमेंट मिळण्याचे आमिष दाखवले. विवाहितेने कुपण स्कॅन केल्यानंतर संशयीतांनी त्यांच्या बँक खात्यातून एक लाख 20 हजारांची रक्कम लंपास केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने सोमवारी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयित मनजीतसिंग (8403847358/7008235796) व संदीपकुमार शर्मा (8876232717) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !